व्हिडिओ: जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घरात खेकडेच खेकडे; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचा परिणाम

मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतल्याचे समजते. या विधानावरुन ठाकरे यांनी सावंत यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते. दरम्यान, सावंत यांनी हे आपले विधान नसून आपण बोलताना केवळ इतरांनी केलेल्या विधानाचा दाखला दिल्याचे प्रसारमाध्यमांकडे म्हटले आहे.

व्हिडिओ: जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घरात खेकडेच खेकडे; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचा परिणाम
crabs outside the residence of Maharashtra Water Conservation Minister Tanaji Sawant | (Photo Credits-ANI)

शिवसेना (Shiv Sena)  नेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात आज खेकडेच खेकडे पाहायला मिळाले. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले. या धरणफुटीच्या कारणांबद्दल बोलताना तानाजी सावंत (Conservation Minister Tanaji Sawant) यांनी केलेल्या वक्तव्याचा निशेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे येथे आंदोलन केले. या आंदोलनाचा भाग म्हणून या कार्यकर्त्यांनी मंत्री सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थानी खेकडे सोडले. खेकड्यांनी भोक पाडल्यानेच रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण (Tiware Dam) फुटल्याचे सावंत यांनी म्हटले होते. धरणफुटीच्या कारणांबाबत बोलताना सावंत यांनी हे निराधार विधान केले होते. या वक्तव्यामुळे सावंत हे टीकेचे धनी झाले आहेत.

दरम्यान, सावंत यांनी तिवरे धरण फुटीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. तसेच, विविध राजकीय पक्षांनी आणि नेटीझन्सनी सोशल मीडियावर सावंत यांच्यावर टीकेची झोडच उठवली. सावंत यांच्या वक्तव्यावर लोकभावना तीव्र आहेत. अद्यापही सावंत याच्या वक्तव्यावरुन लोकभावना तीव्र असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या पुण्यातील निवास्थानी खेकडे सोडून आंदोलन केले. या वेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही केली.

दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतल्याचे समजते. या विधानावरुन ठाकरे यांनी सावंत यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते. दरम्यान, सावंत यांनी हे आपले विधान नसून आपण बोलताना केवळ इतरांनी केलेल्या विधानाचा दाखला दिल्याचे प्रसारमाध्यमांकडे म्हटले आहे. (हेही वाचा,रत्नागिरी: 'खेकड्यांनी भोक पाडल्यानं तिवरे धरण फुटलं' जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे धक्कादायक विधान )

तानाजी सावंत यांनी नेमके काय म्हटले होते?

गेल्या 15 वर्षात धरणाला काही झालेलं नाही. धरणात खेकड्यांनी घर केल्यामुळे धरणाला गळती लागली. धरणाचं काम निकृष्ठ नव्हतं. तिवरे धरणफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही दुर्घटना होती. गावकरी आणि अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरलं, त्यामुळेच ते फुटलं, असे विधान सावंत यांनी केले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2019 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).