Water Conservation Minister Tanaji Sawant shocking statement | (Photo credit: archived, modified, representative image)

तिवरे धरण ( Tiware Dam ) फुटल्याचे एक धक्कादायक कारण पुढे आले आहे. विशेष म्हणजे हे कारण जलसंधारण मंत्री तानाजी सावंत (Water Conservation Minister Tanaji Sawant) यांनीच सांगितले आहे. तानाजी सावंत यांच्या म्हणण्यानुसार 'तिवरे धरण हे खेकड्यांनी भोक पाडल्याने फुटलं'. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र, तानाजी सावंत यांनी दिलेल्या कारणाची धरणफुटीपेक्षाही अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

तिवरे धरण फुटले. त्याने अनेकांचे बळी घेतले. काही जखमी झाले. काहींचे संसार उदद्ध्वस्त झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणेच सुरु झाली आरोप प्रत्यारोप आणि या घटनेला जबाबदार कोण? या विषयी चर्चा. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल येईल दोषींना शिक्षा होईल. पण, तत्पूर्वी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी धरण फुटीच्या कारणाबद्दल केलेल्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मंगळवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण (Tiware Dam) फुटले. यात धरणाजवळील 12 घरे वाहून गेली. तर, 13 जण मृत्यू पावले. धरणाच्या पाण्यात वाहून गेलेल्यांपैकी अद्यापही 9 जण बेपत्ता आहेत. (हेही वाचा, तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांप्रती दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश)

दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण (Tiware Dam) फुटले असून यात 22-24 जण वाहून गेल्याचे भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसंच धरणाजवळील 12 घरे वाहून गेली आहेत. मदतकार्य सुरु असून त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वाहून गेलेल्यांपैकी 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत.