CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण (Tiware Dam) फुटल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही वाहून गेलेल्यांपैकी 16 जण बेपत्ता आहेत. तसंच धरणाजवळील 12 घरे वाहून गेली आहेत. या सर्व परिस्थितीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे कलेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसंच परिस्थितीचा आढावा घेत अधिक चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करत गिरीश महाजन यांना घटनास्थळाची भेट घेण्याचे आदेश दिले आहेत. (रत्नागिरी: चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याने 24 जण वाहून गेल्याची भिती; 6 मृतदेह सापडले)

ANI ट्विट:

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तिवरे धरण फुटलं आणि आजूबाजूच्या सात गावांमध्ये पाणी शिरलं. इतकंच नाही तर यात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही बचावकार्य सुरु आहे.