Tiware dam in Ratnagiri was breached (Photo Credits: ANI)

दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण (Tiware Dam) फुटले असून यात 22-24 जण वाहून गेल्याचे भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसंच धरणाजवळील 12 घरे वाहून गेली आहेत. मदतकार्य सुरु असून त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वाहून गेलेल्यांपैकी 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे तिवरे धरण भरुन वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे निर्दशनास येताच गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर तासाभरातच गावांमध्ये पाणी शिरले आणि त्यात घरांसह माणसे देखील वाहून गेली.

ANI ट्विट:

ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह 7 गावांमध्ये पाणी शिरलं आहे. तर दादर पूल पाण्याखाली गेल्याने सातही गावांशी संपर्क तुटला आहे.