
सात महिन्यांच्या बाळाचा 21 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. बुधवारी (23 एप्रिल) विरार च्या Bolinj भागात ही दुर्देवी घटना घडली आहे. खिडकी बंद करताना आईचा तोल गेला आणि तिच्या हातातून बाळ निसटून 21व्या मजल्यावरून खाली पडले. विरार पश्चिमेला असलेल्या Joy Ville residential complex मधील Pinnacle building मधील हा प्रकार आहे. विकी सदाणे आणि पूजा सदाणे या जोडप्याला लग्नाच्या 7 वर्षांनंतर बाळ झालं होतं. या घडनेच्या अवघ्या दिवसाभरापूर्वी बाळाला 7 महिने पूर्ण झाले होते.
दुपारी 3.15 च्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या वेळी विकी सदाणे कामावर होते. काही नातेवाईक बाळाला पाहण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. खिडकी बंद करण्याचा प्रयत्न करत असताना पूजा सदाणे खिडकीजवळ साचलेल्या पाण्यावर घसरली, ज्यामुळे तिचा पाय घसरला. बाळ खांद्यावरून पडले आणि खाली जमिनीवर कोसळले आणि जागीच बाळाचा मृत्यू झाला. नक्की वाचा: UP: निर्दयी आईने नवजात अर्भकाचा मृतदेह फेकला शेतात, कुत्र्यांनी कुरतडल्यामुळे बाळाचा मृत्यू .
खिडकीला पूर्ण संरक्षक ग्रिल नव्हते. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बोलिंज पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या विनाशकारी घटनेने कुटुंब आणि स्थानिकांनाही धक्का बसला आहे.