UP: निर्दयी आईने नवजात अर्भकाचा मृतदेह फेकला शेतात, कुत्र्यांनी कुरतडल्यामुळे बाळाचा मृत्यू
जगात आईसारखे दुसरे पवित्र नाते नाही. आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मात्र उत्तर प्रदेशातील एका जन्मदात्या मातेने असे पाऊल उचलले आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या क्रूर आईने नवजात बाळाला शेतात फेकून दिले. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील मिलक पोलीस स्टेशन हद्दीतील खमरियान गावात त्यावेळी गोंधळ उडाला होता.
UP: जगात आईसारखे दुसरे पवित्र नाते नाही. आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मात्र उत्तर प्रदेशातील एका जन्मदात्या मातेने असे पाऊल उचलले आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या क्रूर आईने नवजात बाळाला शेतात फेकून दिले. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील मिलक पोलीस स्टेशन हद्दीतील खमरियान गावात त्यावेळी गोंधळ उडाला होता. गावकऱ्यांनी शेतात नवजात अर्भकाचा मृतदेह पाहिला. कुत्रे मृतदेह कुरतडत असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्यांचा आवाज ऐकून गावकरी शेतात पोहोचले असता त्यांना हे नवजात अर्भक दिसले. याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. @News1IndiaTweet या हँडलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
नवजात अर्भकाचा मृतदेह फेकला शेतात
अज्ञात माँ ने अपने कलेजे के टुकड़े को फेंका...
रामपुर : खेत में मिला नवजात का शव
कलयुगी मां ने जन्म देने के बाद फेंका
कुत्ते नोच रहे थे नवजात का शव
मौके पर पहुंचे ग्रामीणों ने कुत्तों को भगाया
पुलिस को दी गई सूचना@rampurpolice @Uppolice #Rampur pic.twitter.com/3LFP7WyJlz
— News1India (@News1IndiaTweet) December 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2024 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

