Kalyan: पोलिसांना शिवागाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसच्या दोन महिला कार्यकर्त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी
Jail (Representational Image/ Photo Credits: IANS)

कल्याणच्या (Kalyan) रहेजा परिसरात काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात 8 ऑक्टोबर रोजी रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसकडून (Congress) आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, या आंदोलनादरम्यान पोलिसांना शिविगाळ करणे काँग्रेसच्या दोन महिला कार्यकर्त्यांना महागात पडले. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली आहे. तसेच त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून 8 ऑक्टोबर रस्त्यांवरील खड्यांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावेळी बाजारपेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, दोन महिला कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवले असताना त्यांनी पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन अखेर या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी काँग्रेसची ही महिला कार्यकर्त्या आणि त्यांच्या मैत्रिणीला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोघींना कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. यासंदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Aryan Khan Drugs Case: सॅनिटरी पॅडमध्ये लपवून महिलेने क्रुजवर ड्रग्ज नेल्याचा NCB कडून मोठा खुलासा

तरन्नूम खान आणि रोशन खान अशी दोघींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात विरोधात कलम 186, 509, 34 सह माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम 200 चे कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना केलेल्या शिवीगाळावरून विरोधकांकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.