Uttam Bandu Tupe | (Photo credit: archived, edited, symbolic images)

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे (Uttam Bandu Tupe) यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. पुणे येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तम बंडू तुपे हे गेले काही काळ प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. तुपे यांनी आपल्या साहित्यातून उपेक्षीत, दलीत आणि शोशितांचा आवाज मांडला. त्यांची 'झुलवा' (Jhulwa) ही कादंबरी प्रचंड गाजली. त्यावर 'झुलवा' नावाचे नाटकही आले होते. तेव्हा पासून त्यांना 'झुलवाकार' (Jhulwakar) म्हणून ओळकले जात असे. उत्तम तुपे यांच्या पत्नी जिजा यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. तेव्हापासून एकटे पडलेले तुपे हेसुद्धा प्रकृती अस्वास्थ्याने ग्रासले गेले.

पुणे येथील जहांगीर रुग्णालयात उत्तम बंडू तुपे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, डॉक्टरांच्याक प्रयत्नांना यश येऊ शकले नाही. तुपे यांनी अखेरचा श्वास घेतला. तुपे यांश्चा पश्चात दोन मुलं असा परिवार आहे. एकदोन नव्हे तर तबबल 16 कादंबऱ्या, अनेक लघुकथा तुपे यांच्या नावावर आहेत. या सर्व कादंबऱ्यांमध्ये त्यांची 'झुलवा' ही कादंबरी प्रचंड गाजली. या कादंबरीने त्यांना नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ते झुलवाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या कादंबऱ्याही प्रचंड गाजल्या. पण, त्यांना खरी प्रसिद्धी दिली ती 'झुलवा' कादंबरीनेच. (हेही वाचा, असो की 'एकांत', प्रत्येक वेळी नवा अनुभव देणारा मित्र 'पुस्तक')

उत्तम बंडू तुपे यांची साहित्यसंपदा

इजाळ (कादंबरी), खाई (कादंबरी), खुळी (कादंबरी), चिपाड (कादंबरी), झावळ (कादंबरी), झुलवा (कादंबरी), भस्म (कादंबरी), लांबलेल्या सावल्या (कादंबरी), शेवंती (कादंबरी), संतू (कादंबरी), आंदण (लघुकथा संग्रह), पिंड (लघुकथा संग्रह), माती आणि माणसं (लघुकथा संग्रह), कोबारा (लघुकथा संग्रह), काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)

दरम्यान, उत्तम बंडू तुपे यांना राज्य सरकार आणि इतर संस्थांचे अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या 'आंदण' नावाच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. तर 'काट्यावरची पोटं' ही त्यांची आत्मकथा महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आली. 'झुलवा' ही कादंबरी राज्य सरकारची पुरस्कार विजेती कादंबरी ठरली.