वेंगुर्ला: माशांच्या जाळीत अडकलेल्या 95 किलो Green Sea Turtle ची  मच्छिमारांकडुन सुटका, आदित्य ठाकरेंनी केलंं कौतुक (Watch Video)
Green Sea Turtle (Photo Credits: Twitter)

प्राणी आणि जीवसृष्टीच्या बाबत मानवाकडुन नेहमीच अन्याय होत असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या, ऐकल्या आहेत, मात्र अलिकडेच वेंगुर्ला (Vengurla) येथे घडलेल्या एका घटनेत अजुनही माणुसकी शिल्ल्क आहे याची प्रचिती येते. वेंगुर्ला येथील समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही मच्छिमारांंच्या जाळीत एक दुर्मिळ असं हिरव्या रंगाचं कासव (Green Sea Turtle) पकडलं गेलं होतं. मासे पकडायच्या जाळीत या कासवाचं अंग अडकल्याने त्याला बाहेर पडता आलं नाही आणि तब्बल 95 किलोचं हे कासव मच्छिमारांंच्या हाती लागलं.यावेळी कासव इतक्या विचित्र पद्धतीने अडकलं होतं की त्याला सहज बाहेर काढणंं शक्यच नव्हतं आणि त्या अडकलेल्या परिस्थितीत त्याची वाईट अवस्था होत होती, अशावेळी या मच्छिमारांंनी आपली मासे पकडायची जाळी फाडुन त्याची सुटका केल्याचे समजत आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असुन मच्छिमारांंच्या या कामाचे स्वतः पर्यटन आणि पर्यावरण मंंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांंनी सुद्धा कौतुक केले आहे.

Real Dinosaur Cloned in China? Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क

रणजीत जाधव या ट्विटर युजर ने हा व्हिडिओ शेअर करत असे कासव हाती लागल्याची माहिती दिली आहे. या खाली दिलेल्या व्हिडिओत सुद्धा तुम्ही पाहु शकता की सुरुवातीचा बराच वेळ हे कासव हलुही शकत नव्हते आणि जशी त्याची सुटका होते ते अक्षरशः तडफडु लागते. हे तब्बल 95 किलो वजनाचे महाकाय स्वरुपातील कासव आहे त्यामुळे त्याला सहजासहजी पलटणे किंंवा हालचाल करणे शक्य होत नाहीये मात्र त्यातही हे मच्छिमार त्याची मदत करत आहेत.

95 किलोचे Green Sea Turtle

दरम्यान कासवांंची Green Sea Turtle ही प्रजाती समुद्री जीवसृष्टीसाठी बरीच फायदेशीर आहे, समुद्री गवत जे की मासे व अन्य जलचरांंसाठी खाद्य असते त्याच्या वाढीला या कासवांंच्या अंड्यांंमुळे बरीच मदत होते. साधारणतः हे जीव अटलांंटिक व पॅसिफिक समुद्रात आढळतात, भारतीय समुद्रातही त्यांंचे वास्तव्य आढळुन आले आहे.