Real Dinosaur Cloned in China? Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क
Dinosaur video (Photo Credits: Video grab)

2020 मध्ये आतापर्यंत इतकी जास्त संकटं आली आहेत की आता केवळ एलियन आणि डायनॉसर (Dinasour) ची कमी राहिलीये असे मीम्स आपण खुप पाहिले असतील. पण कोणाला माहित होतं की असा काही प्रकार खरंच होण्याची शक्यता आहे. होय, अलिकडेच जुरासिक वर्ल्ड (Jurassic World's Exhibition)  च्या एका प्रदर्शनात अगदी डायनॉसर सारखा दिसणारा तसा लहान आकाराचा प्राणी दिसुन आला आहे. याच प्रदर्शनातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती या प्राण्याला हातात घेउन उभा असल्याचे दिसतेय नीट पाहिल्यास हा प्राणी डायनॉसोर चा मिनी व्हर्जन आहे असं म्हणता येईल. हा व्हिडिओ खुप शेअर केला गेलाय आणि अनेकांंनी हा प्राणी म्हणजे चीन ने आता डायनॉसरचे क्लोनिंंग करुन बनवलेला जीव आहे असेही म्हंंटले आहे. पण थांंबा तुम्हीही काही तर्क वितर्क लावण्याआधी हा नेमका काय व्हिडिओ आहे आणि हा प्राणी नेमका कोणी आहे हे पाहुन घ्या.. A Giant Rat Found In Mexico: मॅक्सिकोमध्ये सापडला माणसापेक्षा मोठा उंदीर; सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील सत्य घ्या जाणून

तर, हा व्हायरल व्हिडिओ दाखवतोय तसा हा काही कोणी खरा प्राणी नाही उलट हा जुरासिक वर्ल्ड च्या प्रदर्शनासाठी बनवण्यात आलेला एक रोबोटिक प्राणी आहे. Parasaurolophus या जातीच्या प्राण्याचे हे छोटे स्वरुप आहे, ज्या व्यक्तीच्या हातात हा प्राण्याचा नमुना आहे तो त्याला आपल्या हाताने एखाद्या बोलक्या बाहुल्या सारखा चालवत आहे. त्यामुळे हा प्राणी खरा नाही हे तर अगदी सरळ आहे. Hero Rat Wins A Top Animal Award: आफ्रिकन प्रजातीचा Magawa उंदिर 'शौर्य' पुरस्कारने सन्मानित; 'अशा' प्रकारे वाचवले हजारो लोकांचे प्राण

पहा हे व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, या व्हिडिओ बाबत केलेला दुसरा दावा म्हणजे हा चीन च्या प्रयोग शाळेत बनवलेला प्राणी आहे, आता हा असा दावा नेटकरी का करतायत हे काही वेगळे सांंगायला नकोच पण यात काहीही तथ्य नाही. मुख्य म्हणजे असे अनेक व्हिडिओ आणि खरंतर बातम्या सुद्धा दिवसभर व्हायरल होत असतात पण त्याची पुर्णतः पडताळणी करणे प्रकर्षाने टाळा.