Urmila Matondkar To Join Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार- संजय राऊत
Urmila Matondkar | (Photo Credits: Facebook)

Urmila Matondkar To Join Shiv Sena:  बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा राजकरणात एन्ट्री करणार आहे. तर काँग्रेस (Congress) पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उर्मिला आता शिवसेनेत मंगळवारी प्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी तिच्या राजकीय प्रवेशाबद्दल चर्चा केली जात होतीच. पक्षाचे पदाधिकारी यांनी रविवारीच याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय हर्षल प्रधान यांनी असे म्हटले होते की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उर्मिला शिवसेनेत प्रवेश करणारआहे.

खरंतर महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने उर्मिला मातोंडकर हिला विधान परिषदेचे सदस्य बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी तिचे नाव राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पाठवले होते. त्याचसोबत विधान परिषदेसाठी राज्यपाल कोट्यातून महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना 12 नावांची यादी ही पाठवली होती.(Urmila Matondkar To Join Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार)

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. या तिन्ही पक्षाकडून प्रत्येकी चार-चार नेत्यांची नावे राज्यपाल यांना पाठवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस केली गेली आहे. तर काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांचे नाव दिले आहे. तर शिवसेनेने उर्मिला मातोंडकर, चंद्रकात रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटिल यांचे नाव दिले आहे.(Maharashtra MLC Election 2020: उर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेना कोट्यातून राज्यपाल नियुक्त जागेसाठी सूचवण्यामागे 'हे' आहे कारण)

दरम्यान, उर्मिला मातोंडकर हिने याआधी सुद्धा राजकरणात प्रवेश केला होता. तर 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीपूर्वी तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तिला काँग्रेसकडून मुंबई उत्तरचे तिकिट ही दिले गेले. मात्र उर्मिला हिचा लोकसभा निवडणूकीत पराभव स्विकारावा लागला होता. त्यावेळी तिच्या विरोधात उभे असलेले भाजपचे नेते गोपल शेट्टी यांचा विजय झाला होता.