भारत-पाकिस्तान मधील तणावग्रस्त परिस्थितीनंतर आता भारतीय रेल्वे जम्मू- दिल्ली, उधमपूर-दिल्ली 3 विशेष ट्रेन्स चालवणार आहेत. सध्या पाकिस्तान कडून नियंत्रण रेषेजवळ हल्ला केला जात आहेत. यामधून नागरी वस्ती, दुकानं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं चित्र आहे. या विशेष ट्रेन्स च्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवता येणार आहे. 12 अनारक्षित आणि 12 आरक्षित डबे असलेली 04612 ही गाडी सकाळी 10.45 वाजता जम्मूहून धावेल. वंदे भारत दुपारी 12.45 वाजता उधमपूरहून जम्मू आणि पठाणकोटमार्गे धावेल. जम्मूहून संध्याकाळी 7 वाजता आणखी एक पूर्णपणे आरक्षित विशेष गाडी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  नक्की वाचा: India Pakistan War: सोशल मीडियावर अफवा, भारतातील विमानतळांवर प्रवेश बंदी; सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाही.  

भारतीय रेल्वे चालवणार विशेष ट्रेन्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)