
Catholic Church News: व्हॅटिकनमध्ये (Vatican City) जगाला गुरुवारी एक महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला, जेव्हा सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर (White Smoke Sistine Chapel) निघाला, जो कार्डिनल्स कॉलेजने नवीन पोपची निवड (Election Of Pope) करण्याचे संकेत देत होता. गेल्या महिन्यात ईस्टर संडेच्या दुसऱ्या दिवशी निधन झालेल्या पोप फ्रान्सिस (Pope Francis Death) यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या पोप कॉन्क्लेव्हचा हा औपचारिक शेवट आहे. व्हॅटिकन (Vatican Conclave) वृत्तानुसार, सेंट पीटर बॅसिलिका येथे सहा घंटा वाजल्याने कॅथोलिक चर्चने त्यांचा पुढील आध्यात्मिक नेता निवडल्याची पुष्टी झाली. नव्या निवडीबाबत सांगताना अधिकृत व्हॅटिकन चॅनलने घोषीत केले की, "आनंदाचा क्षण आहे, प्रतीक्षा संपली आहे".
पांढरा धूर आणि गर्दीचा जल्लोष
व्हॅटीकन येथील सेंट पीटर्स स्क्वेअरवर जमलेल्या गर्दीने पोपच्या निवडीचे पारंपारिक प्रतीक - पांढरा धुर - पाहिला तेव्हा जल्लोष केला. हा जल्लोष दर्शवत होता की, कार्डिनल इलेक्टर्स एकमत झाले आहेत. (हेही वाचा, Papstwahl Conclave: व्हॅटिकन कॉन्क्लेव्ह सुरू, पांढरा धूर निघण्याची शक्यता; जगाला मिळणार New Pope)
पोपची निवड प्रक्रिया आणि परंपरा
कॉन्क्लेव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अत्यंत गुप्त आणि पवित्र प्रक्रियेत एकूण 133 कार्डिनल मतदान करण्यास पात्र होते. निवडीबाबात सांगायचे तर, निवडून येण्यासाठी, उमेदवाराला किमान दोन तृतीयांश मते मिळवावी लागतील. प्रत्येक मतदान सत्रातील मतपत्रिका मोजणीनंतर जाळल्या जातात: काळा धूर कोणताही निर्णय न घेण्याचे संकेत देतो, तर पांढरा धूर यशस्वी निवडणुकीचे संकेत देतो. (हेही वाचा, Pope Francis Passes Away: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
नवे पोप लवकरच जगास सादर
नवनिर्वाचित पोप लवकरच सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या मध्यवर्ती खिडकीवर पहिल्यांदा उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, जिथे त्यांना ख्रिश्चन धर्माचे नवीन धर्मगुरू म्हणून जगासमोर सादर केले जाईल.
ऐतिहासिकदृष्ट्या, मागील दोन पोप - पोप बेनेडिक्ट सोळावा आणि पोप फ्रान्सिस - देखील या वर्षीच्या प्रक्रियेप्रमाणेच कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी निवडून आले.
दरम्यान, चर्चच्या परंपरेनुसार कॉन्क्लेव्ह बुधवारी सुरू झाला, ज्यामध्ये कार्डिनल्स कोणत्याही बाह्य प्रभावाशिवाय विचार करू शकतील याची खात्री करण्यासाठी पूर्ण गुप्ततेवर भर देण्यात आला. नवीन पोपची ओळख लवकरच उघड होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अटकळांना पूर्णविराम मिळेल आणि जगभरातील 1.3 अब्ज कॅथोलिक समुदायासाठी एक नवीन अध्याय सुरू होईल.