Mumbai Metro Line 3 Phase 2A Inauguration: मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन वर आज बीकेसी ते वरळी नाका दरम्यानच्या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्घाटन; 10 मे पासून सेवा नागरिकांसाठी खुली होणार

MMRC कडून बीकेसी ते आचार्य अत्रे चौक साठी 10 मे पासून सकाळी 6.30 वाजता सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Metro-3 | (Photo Credits: facebook)

मुंबई मेट्रो 3 अ‍ॅक्वा लाईन (Mumbai Metro 3) वर आज (9 मे) फेज 2 म्हणजेच बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी (BKC to Acharya Atre Chowk) या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन-3 सेवेच्या विस्ताराचा शुभारंभ केला जाणार आहे. उद्या 10 मे पासून ही सेवा नागरिकांच्या सेवेमध्ये येणार आहे. मुंबई मेट्रो 3 अ‍ॅक्वा लाईन मुळे आता पश्चिम उपनगरामधून दादर, वरळी सारख्या भागामध्ये पोहचण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.

मुंबई मेट्रोच्या या 9.77 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मार्गामुळे मुंबई लोकल ट्रेनचा पश्चिम मार्गावरील भार लक्षणीयरीत्या कमी होईल आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Mumbai Metro 3 फेज 2 चं आज उद्घाटन

मुंबई मेट्रो 3 अ‍ॅक्वा लाईन वरील स्थानकं

मुंबई मेट्रो 3 च्या दुसर्‍या टप्प्यातील स्थानकांमध्ये धारावी, शितलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक यांचा समावेश आहे. यामध्ये मिठी नदीवर 915 मीटरचा बोगदा देखील आहे.

MMRC कडून बीकेसी ते आचार्य अत्रे चौक साठी 10 मे पासून सकाळी 6.30 वाजता सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी हा  12.44 किमी लांबीचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 10 स्थानकांचा समावेश आहे. सकाळी 6.30 ते रात्री 10.30 पर्यंत दररोज 96 फेऱ्या चालवल्या जात आहेत. यामध्ये आरे ते बीकेसी हा रस्ता मार्गे तासाभराचा प्रवास मेट्रोने फक्त 30 मिनिटांपर्यंत आला आहे. या मार्गावरील तिकिटांचे दर 10 ते 50 रुपयांच्या दरम्यान आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 09, 2025 08:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).