Mumbai Rains 2019: मुंबई मध्ये परतीच्या पावसाची रिमझिम बरसात; 22 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा अंदाज
Monsoon (Photo Credits: Wikimedia Commons)

Mumbai Monsoon: मुंबई व उपनगरात तसेच ठाण्यात आज (18 ऑक्टोबर) पासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 ऑक्टोबर रोजी येत्या दोन दिवसात पाऊस पूर्णतः परतणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र वातावरणाचे सद्य परिस्थिती पाहता साधारण 22 ऑक्टोबर पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तूर्तास पावसाचे प्रमाण अगदीच तुरळक असल्याने कोणत्याहीप्रकारची आपत्तीजन्य स्थिती निर्माण झालेली नाही मात्र जर का येत्या दिवसात सुद्धा पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Monsoon Forecast: महाराष्ट्रात पुणे, विदर्भ, रत्नागिरी मध्ये वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सोबतच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहील. तसेच या भागात वादळी पावसाची शक्यता असल्याचे समजत होते. या पावसाची सुरुवात मुंबईतील माहीम व लगतच्या परिसरातून झाल्याचे समजत आहे.

पहा ट्विट

दरम्यान,राज्यात सध्या ऑक्टोबर हिट मुळे बदलत्या हवामानानुसार सर्दी- तापाच्या आजारांची साथ पसरत आहे. अशातच परतीच्या पावसामुळे वातावरण आणखीन खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितकी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.