मुंबईमधून परतीचा मान्सून गेल्याची माहिती काही दिवसांपूर्वी हवामान खात्याकडून देण्यात आली असली तरीही राज्यात अद्याप काही भागात नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्याने हवामान कोरडे आहे. उद्या (18 ऑक्टोबर) पर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वातावरण ढगाळ राहील तसेच या भागामध्ये वादळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हे देखील वाचा- यंदाच्या पावसाने फक्त पाच दिवसात गेल्या आठ वर्षातील केले रेकॉर्डब्रेक
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सोबतच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहील. दरम्यान या भागात वादळी पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात 19-20 ऑक्टोबरला मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. हवामानाची ही परिस्थिती पाहता आगामी आठवडाभर ही परिस्थिती कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याचा अंदाज
१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान राज्यात परत वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन.https://t.co/qzrEBpptuM pic.twitter.com/Y3wwi2GERz
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 16, 2019
कृषी विभागानेदेखील या काळात शेतकर्यांना आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान महाराष्ट्रात विधानसभेची धामधूम सुरू आहे. अनेक ठिकाणी अचानक कोसळणार्या पावसामुळे कार्यकर्त्यांची धांदल उडत आहे. उन-पावसाच्या खेळामुळेही वातावरणातील बदल नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे.