Representational Image (Photo Credit: IANS)

यंदाच्या वर्षात पावसाचा अधिक जोर महाराष्ट्रसह अन्य ठिकाणी दिसून आला. तर राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांचे अतोनात हाल झाले असून मृतांच्या संख्येत अधिक वाढ झाली आहे. याच परिस्थितीत यंदाच्या पावसाने फक्त पाच दिवसात गेल्या आठ वर्षातील रेकॉर्डब्रेक कामगिरी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी 200mm पावसाची नोंद फक्त 24 तासात करण्यात आली आहे. तर पावसाने गेल्या 2009 ते 2018 मध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षातील पावसाची सरासरी पाहता यंदाच्या वर्षात अतिमुसळधार पाऊस मुंबईसह अन्य देशात झाल्याचे दिसून आले. याचा परिणाम हवामानावर झाल्याचे हवामान खात्याचे माजी वरिष्ठ अधिकारी आर. व्ही.शर्मा यांनी म्हटले आहे. यंदा पावसाने मुंबईत उशिराने हजेरी लावली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.(महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रवास 15 ऑक्टोंबरला, हवामान खात्याचा अंदाज)

प्रत्येक वर्षात साधारण 10 जून पर्यंत पाऊस राज्यात दाखल होते. मात्र यावेळी पावसाने राज्यात 25 जूनला हजेरी लावली. तर फक्त पाच दिवसात पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले असल्याचे केएस होसाळीकर यांनी म्हटले आहे. तसेच फक्त सहा तासात म्हणजेच रात्री 11.30 ते पहाटे 5.30 या कालावधीत 200mm पावसाची नोंद 2 जून रोजी करण्यात आली. तर 4 सप्टेंबरला 121mm पावसाची नोंद सकाळी 8.30 ते 11.30 दरम्यान करण्यात आली आहे. राज्यात यंदा अतिमुसळधार पाऊस पडल्याने हवामानात बदल झाल्ये असून त्याचा परिणाम विविध गोष्टींवर पडला आहे.

तर  हवामान खात्याच्या अंदाजानुसार 30 सप्टेंबर पासून मान्सूनचा हंगाम संपतो. तरीही राज्यात पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून राजस्थान आणि 15 ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्रातून मान्सून बाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.