Maharashtra minister Uday Samant (PC - ANI)

TY University Exams 2020 Dates: महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यापीठांच्या पहिल्या आणि दुसर्‍या वर्षाच्या परीक्षा रद्द करून त्यांना थेट पुढच्या वर्षात ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या परीक्षा वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, 20 जून पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या नियोजनाबद्दल निर्णय घेतला जाईल. दरम्यान युजीसीने दिलेल्या गाईडलाईननुसार 1 ते 31 जुलै दरम्यान विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. Maharashtra University Exams 2020: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात: मंत्री उदय सामंत यांची माहिती.

दरम्यान राज्य सरकारने विद्यापीठांच्या पहिल्या, दुसर्‍या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचे आदेश असले तरीही स्वायत्त संस्था परीक्षांचं नियोजन करत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. दरम्यान सरकारच्या आदेशांचं पालन करणं स्वायत्त संस्थांना बंधनकारक असल्याने त्याच्या बोलून हा प्रश्न मिटवला जाईल असा दिलासा विद्यार्थ्यांना दिला आहे. तसेच ज्यांनी परीक्षा फी भरली त्याबाबतही सरकार लवकरच निर्णय घेऊन त्याबाबतचा दिलासा देणार आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस काळात परीक्षा, शैक्षणिक माहिती, शंका, तक्रारींसाठी 011-23236374 वर कॉल करा- विद्यापीठ अनुदान आयोग.

तिसर्‍या वर्षीच्या ATKT च्या परीक्षांबाबतही निर्णय घेऊन त्याच वेळापत्रक 1 ते 31 जुलै दरम्या नठरवलंजाणार आहे. तर सीईटीच्या विद्यार्थ्यांकडूनही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. मात्र उदय सामंत यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सीईटीची परीक्षा रद्द केल्यास लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. दरम्यान यंदा जिल्हा स्तराऐवजी तालुका स्तरावर परीक्षा घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.