कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा विचार करुन विद्यार्थी, पालकांमध्ये निर्माण होणारा परीक्षा, शौक्षणिक माहिती यांबाबतची शंका, संभ्रम आणि तक्रारी दूर करण्यासाठी विद्यापीठ आनुदान आयोग (University Grants Commission) पुढे सरसावला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या तक्रारी, शंका दूर करण्यासाठी विद्यापीठ आनुदान आयोगाने (UGC) संपर्कासाठी 011-23236374 दुरध्वनी क्रमांक आणि covid19help.ugc@gmail.com हा इमेल आयडी उपलब्ध करुन दिला आहे. या संपर्क क्रमांकावर फोन करुन अथवा दिलेल्या मेल आयडीवर मेल पाठवून विद्यार्थी, पालक आपल्या शंका, तक्रारींचे निवारण करुन घेऊ शकतात.
दरम्यान, कोविड-19 महामारी लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने 29 एप्रिलला परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना आणि शैक्षणिक कॅलेंडर जारी केले आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक कार्यक्रम आखताना सर्व संबंधीतांचे हित आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत, मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व विद्यापीठांना दिल्या आहेत.
कोरना व्हायरस म्हणजेच कोविड 19 या महामारीमुळे परीक्षा आणि इतर शैक्षणिक बाबींशी संबंधित उद्भवलेल्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक कक्ष स्थापन करून त्याबाबत विद्यार्थ्यांना सूचित करावे अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी,शिक्षक आणि संस्थांच्या कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या शंका, तक्रारी आणि इतर शैक्षणिक बाबींविषयी लक्ष घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने खालील पाऊले उचलली आहेत. (हेही वाचा, MHT CET 2020 Exam Dates: महाराष्ट्र सीईटी परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत 20 मे पर्यंत वाढवली, पाहा mahacet.org नवे वेळापत्रक)
विद्यापीठ अनुदान आयोगाने उपलब्ध करुन दिलेली सुविधा
- समर्पित मदत क्रमांक 011-23236374 देण्यात आला आहे.
- covid19help.ugc@gmail.com हा ई मेल एड्रेस निर्माण करण्यात आला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यार्थी तक्रार निवारण या सध्याच्या
- https://www.ugc.ac.in/grievance/student_reg.aspx ऑनलाईन पोर्टलवरही विद्यार्थी तक्रार नोंदवू शकतात.
- विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी एक कृती दलही स्थापन करण्यात आले आहे.
COVID-19: प्लाझ्मा दान करत तबलिगी जमाती मधील काही नागरिकांनी सोडला रमदान चा उपवास - Watch Video
सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी या सार्वजनिक नोटीसची एक प्रत आपल्या अधिकृत संकेत स्थळावर अपलोड करावी आणि ई मेल किंवा इतर डिजिटल माध्यमातून शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यापर्यंत ती पोहोचवावी, असे अवाहनही विद्यापीठ अनुदान आयोगाने केले आहे.