
कोरोना व्हायरस मुळे देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची वाढत जाणारी संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या तर काहींच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. त्यातच महाराष्ट्र सीईटी परीक्षेची अर्ज भरण्याची तारीख देखील पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 20 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. या नवीन वेळापत्रकाबाबत माहिती मिळविण्यासाठी mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्या.
हा निर्णय देशामधील लॉकडाऊन वाढविल्यामुळे घेण्यात आला आहे. याआधी या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 मे पर्यंत ठेवण्यात आली होती. Corona Update In Maharashtra Today: महाराष्ट्रात एकूण 14 हजार 541 लोकांना कोरोना विषाणूची लागण; राज्यात आज 771 नव्या रुग्णांची नोंद तर, 35 जणांचा मृत्यू
दरम्यान महाराष्ट्रात 12 वीची परीक्षा झाल्यानंतर या सीईटी परीक्षा पार पडते. मात्र कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी शिक्षण मंडळाने 1-8 वीच्या परीक्षा रद्द झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तर 10वीच्या भूगोल विषयाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. तर मुंबई विद्यापीठाने देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
MHT CET 2020 ऑनलाईन अर्ज कसा कराल?
- cetcell.mahacet.org ही अधिकृत वेबसाईट ओपन करा.
- MHT CET 2020 या होमपेजवरील लिंकवर क्लिक करा. त्यानंतर नवं पेज ओपन होईल.
- तुम्ही याआधीच साईन अप केलं असेल तर लॉगिन करा.
- त्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.
- त्यानंतर सबमीट बटण वर क्लिक करा.
महाराष्ट्राचा कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 वर पोहचली आहे. यापैकी 2645 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सीईटी परीक्षा होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.