Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले आहेत. महाराष्ट्रात आज 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 771 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येने 14 हजार 541 चा आकडा गाठला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत 42 हजार 836 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 389 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 हजार 762 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे शहरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. हे देखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COVID-19 च्या NAM संमेलनात दहशतवाद, खोट्या बातम्या आणि डॉक्टरांच्या व्हिडिओंविषयी व्यक्त केली चिंता

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.