पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरससारख्या महाभयाण विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ 'नाम' संमेलनामध्ये सहभाग घेतला. यात NAM सदस्य देशांसह कोरोना संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. या संमेलनात पीएम नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरुद्धचे हे एक महायुद्ध आहे, मात्र काही लोक दहशतवाद, खोट्या बातम्या यांसारखे घातक व्हायरस पसरवण्यामध्ये व्यस्त आहे. ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे असे सांगितले. या व्हिडिओ च्या माध्यमातून ते देशांमध्ये फूट पाडण्याच्या असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, 'या संकटसमयी आम्ही पाहिले आहे की जनआंदोलन बनविण्यासाठी लोकतंत्र, अनुशासन आणि निर्णायकता या गोष्टी कशा एकत्र येऊ शकतात. तसेच आम्ही आमच्या नागरिकांना सांभाळून अन्य देशांची सुद्धा मदत करत आहोत. आम्ही पूर्ण जगाला एकच कुटूंब मानतो.'
हेदेखील वाचा- Coronavirus in India: भारतात COVID-19 रुग्णांच्या संख्येत वाढ, एकूण आकडा 42,836 वर
#WATCH "Even as the world fights #COVID19, some people are busy spreading some other deadly viruses such as terrorism, fake news and doctored videos to divide communities and countries," PM Narendra Modi while addressing Non-Aligned Movement Summit through video conferencing pic.twitter.com/BE85S4qhd9
— ANI (@ANI) May 4, 2020
तसेच NAM संमेलन ही एकजुटता वाढविण्यासाठी मदत करु शकते. या एकजूटतेसाठी नाम ती गरज आहे. या संमेलनात पंतप्रधानांनी त्या सर्व लोकांबद्दल दु:ख व्यक्त केले ज्यांनी कोविड-19 विरुद्ध असताना मरण पावले. सध्या संपूर्ण जग सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे.
देशात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन हा आकडा आता 42,836 वर जाऊन पोहोचला आहे. यातील 11,762 रुग्ण बरे झाले असून 1389 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात गेल्या 24 तासांत देशात 2573 नवे रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातील ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.