भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला. तसेच सरकारने विशेष नियमावली तयार करुन काही भागात निर्बंध शिथिल करण्यात आले. परंतू देशात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन हा आकडा आता 42,836 वर जाऊन पोहोचला आहे. यातील 11,762 रुग्ण बरे झाले असून 1389 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात गेल्या 24 तासांत देशात 2573 नवे रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातील ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तर जगभरात आतापर्यंत 34 लाखांहून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक म्हणजेच 12,974 रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ गुजरातमध्ये सर्वाधिक म्हणजेच 5428 रुग्ण आहेत. नवी दिल्लीत हाच आकडा 4549 वर जाऊन पोहोचला आहे. Lockdown: दारूसाठी दुकांनासमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा: दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रात तळीरामांच्या लांबच लांब रांगा; Watch Video
भारताची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी काही गोष्टी अंशत: सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याची सुचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक सुचना नियमावली जाहीर केली आहे.
महाराष्ट्रात 12,974 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 548 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहेत. तर 2115 रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात मजूर आणि कामगार वर्ग अडकून पडला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने यांच्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आली आहे. मात्र यावेळी कामगारांची वैद्यकिय तपासणी आणि रजिस्ट्रेशन करुन आपल्या घरी पाठवले जात आहेत. तसेच रविवारी कोविड वॉरियर्सला भारताच्या सैन्य, नौदल आणि वायू दलाकडून मानवंदना देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केल्याचे दिसून आले.