Maharashtra University Exams 2020: विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात: मंत्री उदय सामंत यांची माहिती
Exams | Representational Image (Photo Credits: Getty Images)

Maharashtra University Exams, CET Exams 2020: महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात महाविद्यालयाच्या परीक्षा, विद्यापीठांच्या परीक्षा (University Exams) सोबतच इतर स्पर्धा परीक्षा आणि सीईटी (CET Exams) परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाबद्दल अनेक संभ्रम होते. आज विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून संवाद साधला आहे. काही दिवसांपूर्वीच युजीसीने एक अहवाल जाहीर करत देशभरात विद्यापीठांच्या परीक्षांच्या वेळापत्रकासाठी गाईडलाईंस जारी केल्या होत्या. त्यानुसार आता हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. अंतिम वर्गाची अंतिम सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेड आणि मार्क्स मेंटेन करण्यासाठी विशेष गुणपद्धती दिली जाईल. पुढील वर्षी ग्रेडिंग सुधारण्यासाठी विशेष परीक्षा पुढल्या वर्षी घेतल्या जातील. मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई विद्यापीठामध्ये ज्या परीक्षा झाल्या त्यांचे सर्वोत्तम मार्क निवडून ग्रेडिंग ठरवलं जाईल. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार होईल. सीईटी परीक्षा महाराष्ट्रात 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै महिन्यात घेतल्या जाणार. सीईटीच्या युजी च्या परीक्षा   1-15 जुलै दरम्यान तर सीईटीच्या पीजी च्या परीक्षा 23-30 जुलै  दरम्यान घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना  काही प्रश्न असल्यास त्यांनी संबंधित विद्यापीठाशी बोलावे. असे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पाहता आता राज्य सरकार युजीसीने दिलेल्या गाईडलाईननुसार  1 ते 31 जुलै दरम्यान परीक्षा घेण्याचा प्रयत्न करेल. UGC Calendar 2020–21: कॉलेज आणि विद्यापीठांच्या स्थगित परीक्षा, आगामी शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया बद्दल नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या तारखा.

दरम्यान महाराष्ट्रात सीईटी परीक्षांच्या प्रवेशप्रक्रियेचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होतील तर काही दिवसांपूर्वीच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक जेईई मेन आणि अ‍ॅडव्हान्स परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तर नीट 2020 या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेची तारीख जाहीर झाली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील परीक्षांच्या वेळापत्रकाचे वेध लागले होते.

आज उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एकाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान काल मंत्री आदित्य ठाकरेंनी देखील विद्यार्थ्यांना दिलासा देताना लवकरच शिक्षणमंत्र्यांकडून वेळापत्रकाबद्दल संभ्रम दूर केला जाईल असं सांगण्यात आलं होतं. तर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनमध्येही 10,12 वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकाल देखील 10 जूनपर्यंत लागू शकतात असा विश्वास व्यक्त केला आहे.