प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

महाराष्ट्र पोलीस दलात भरती (Maharashtra Police Bharti) प्रक्रिया सुरु झाली आहे. आजपासून शारीरिक चाचणी पार पडत आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील बेरोजगारीचे भयान (Unemployment in Maharashtra) वास्तव पुढे आले आहे. भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडे दाखल झालेले अर्जच हे वास्तव दाखवतात. पोलीस दलात एकूण 14 हजार पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी राज्यभातून तब्बल 18 लाख तरुणांनी ऑनलाईन अर्ज केल्याची माहिती आहे. यावरुनच पुढे येते की राज्यात तरुणांना नोकरीची किती गरज आहे. साधे गणित जरी केले तरी लक्षात येते की, 18 लाख अर्जांमधून केवळ 14 हजार जणांचीच निवड होणार. उर्वरीत 17,86,000 हजार तरुणांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

बेरोजगारी वाढण्याचे प्रमाण केवळ महाराष्ट्रातच अधिक नाही. देशभरातील इतर राज्यांमध्येही बेरोजगारीचे वाढते प्रमाण बरेच मोठे आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने नुकताच (1 जानेवारी 2023) देशातील बेरोजगारीची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्या आकडेवारीनुसार देशभरातील राज्यांचे बेरोजगारीचे प्रमाण खालील प्रमाए आहे. (हेही वाचा, Unemployment Rate: राज्यातील बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवर पोहोचला; 16 महिन्यांत सर्वाधिक)

जाणून घ्या राज्यातील बेरोजगारीचा दर-

बिहार- 19.1%

आसाम- 4.7%

हरियाणा- 37.4%

हिमाचल- 7.6%

जम्मू आणि काश्मीर- 14.8%

झारखंड- 18.0%

राजस्थान- 28.5%

तेलंगणा- 4.1%

उत्तर प्रदेश- 4.3%

दिल्ली- 20.8%

उत्तराखंड- 4.3%

छत्तीसगड- 3.4%

गोवा- 9.9%

गुजरात- 2.3%

मेघालय- 2.7%

पश्चिम बंगाल- 5.5%

मध्य प्रदेश- 3.2%

त्रिपुरा- 14.3%

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दल भरती (Maharashtra Police Bharti) प्रक्रियेस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणीला (Physical Efficiency Test) सुरुवात झाली आहे. पोलीस दलात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हजारो तरुणांचे स्वप्न आता वास्तवात उतरणार आहे. राज्यभरातील लक्षवधी तरुण पोलीस भरतीचा नियमीतपणे सराव करत असतात. दरम्यान, राज्य सरकारने भरतीची घोषणा केल्यामुळे तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विशेष म्हणजे ही पोलीस भरती आतापर्यंतच्या पोलीस भरतीपेक्षा काहीशी वेगळी असणार आहे. कारण या भरतीत प्रथमच 100% तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पारदर्शी आणि अचूक भरतीसाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. (हेही वाचा, Unemployment Rate: राज्यातील बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवर पोहोचला; 16 महिन्यांत सर्वाधिक)

शारीरिक चाचणी वेळापत्रक

  • 2 ते 4 जानेवारी 2023 - पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी
  • 5 जानेवारी 2023 - महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी
  • 6 ते 14 जानेवारी 2023- पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी
  • 15 ते 17 जानेवारी- पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी
  • रविवारचा दिवस- चाचणी होणार नाही

मौदानी चाचणी आवश्यक कागदपत्रं

उमेदवारांच्या ओळखपत्र (दोन प्रती) , आवेदन अर्ज छायांकित प्रती (दोन), सर्व मूळ कागदपत्रे, सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच, अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो), आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र.

दरम्यान, काही कारणांमुळे रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेलाही आजपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे राज्यभरांमधील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रदीर्घ काळापासून तरुणांना पोलीस भरतीची आस होती. अखेर तो दिवस उजाडला आहे. त्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवताना दिसत आहेत.