Udayanraje Bhosale | (Photo credit: archived, edited, representative image)

साताराचे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी मध्यरात्री 1 च्या सुमारास त्यांच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मागील काही दिवसांपासून उदयनराजे भाजपा पक्षप्रवेश करणार आहेत याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र आता या वृत्ताला खुद्द राजेंनी ट्वीट करून काल संध्याकाळी माहिती दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज दिल्लीमध्ये उदयन राजे भोसले यांचा भाजपा पक्षप्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. उदयनराजे भोसले यांचा भाजपा पक्षप्रवेश वृत्ताला ट्विटरवरून दुजोरा; 14 सप्टेंबरला नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये रंगणार सोहळा

उदयनराजे भोसले लोकसभेत तीनदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले होते. मात्र उदयनराजे यांचे सातार्‍यात राष्ट्रवादीच्या आमदारांशीही कधी पटले नव्हते. उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सतत वाद रंगत होते. आता रामराजेदेखील भाजपाच्या वाटेवर आहेत. यापूर्वी उदयनराजे भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये भाजपामध्ये प्रवेश करून महसूल राज्यमंत्री झाले होते. आता त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल याबाबत अनेकांच्या मनात कुतुहल आहे.

ANI Tweet 

आज खासदारकीचा राजीनामा सुपूर्त करताना राजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन उपस्थित होते. यापूर्वी फडणवीस यांनीदेखील उदयनराजे भाजपामध्ये आल्यास आनंदच होईल असे म्हटले होते. उद्यन राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत.