उदयनराजे भोसले यांचा भाजपा पक्षप्रवेश वृत्ताला ट्विटरवरून दुजोरा; 14 सप्टेंबरला नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये रंगणार सोहळा
उदयनराजे भोसले (Photo Credot : Youtube)

राष्ट्रवादीचे (NCP) नेते, छत्रपती शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) वंशज व साताऱ्याचे (Satara) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज एका खास ट्विटच्या माध्यमातून आपण भाजपात (BJP)  प्रवेशा घेत असल्याचे निश्चित केले आहे. मागेल कित्येक दिवसांपासून उदयनराजे हाती कमळ घेणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या, काल या चर्चांना विराम देत ही शक्यता खरी असल्याची माहिती समोर आली होती. आज उदयनराजे यांनी स्वतः ट्विट करून या माहितीला दुजोरा दिला आहे. उद्या म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आणि भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा पार पडणार आहे.

उदयनराजे हे राष्ट्रवादीशी बऱ्याच काळापासून जोडलेले होते, मात्र आता जनतेच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन काम करू पाहत आहोत असे म्हणता त्यांनी के खास ट्विट केले आहे. यामध्ये आजवर ज्यांनी आपल्याला पाठिंबा, प्रेम आणि आशीर्वाद दिला त्यांनी यापुढेही सोबत राहावे असे देखील राजे म्हणाले आहेत.

पहा उदयनराजे भोसले ट्विट

प्राप्त माहितीनुसार, भाजपा प्रवेशाचा निर्णय घेण्याआधी उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात एक खास बैठक झाली होती. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांच्याशी देखील काही काळ विस्तृत चर्चा केली. अखेरीस राष्ट्रवादीला रामराम करण्याचा ठाम निर्णय घेत त्यांनी भाजपा प्रवेश निश्चित केला होता. (हेही वाचा: खासदार उदयनराजे भोसले भाजपात आल्यास आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना)

दरम्यान, लोकसभेत भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश पाहता विरोधी पक्षातील अनेकांनी आता भाजपाची वाट धरली आहे. अलीकडेच कृपाशंकर सिंह यांनी सुद्धा काँग्रेस मधील पदाचा राजीनामा दिला होता, येत्या काळात ते सुद्धा भाजपात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चा आहेत.