खासदार उदयनराजे भोसले भाजपात आल्यास आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना
खासदार उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य-File Image)

साताऱ्यामधील (Satara) राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे यांनी फडणवीस यांना भेट दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. तसेच उदयनराजे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत सुद्धा दिले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे जर भाजपात आल्यास आनंदच आहे अशी भावना व्यक्त केली आहे.

परंतु भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय हा उदयनराजे यांचा सर्स्वसी असणार असल्याते बोलले जात आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्षात अनेक वर्ष उदयनराजे यांनी काढले आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रात कांग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जरी असली तरीही साताऱ्यामधील विकासाची कामे अद्याप रखडली आहेत. मात्र उदयनराजे यांनी फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग, सिंचन प्रकल्प या मुद्द्यावर चर्चाकेली असता ती कामे मार्गी लागली. त्यामुळे आता राष्ट्रवादी-काँग्रसेची सत्ता असून ही काही कामे झाली नाहीत ती आता युती सरकारच्या वेळी पूर्ण होत असल्याचे मत उदयनराजे यांनी मांडले आहे.(खा. उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'भाजप'प्रवेश चर्चेला उधाण; राष्ट्रवादीला खिंडार पडायला सुरुवात)

त्याचसोबत लोकांचे हित पाहून मी भाजपात प्रवेश करणार की नाही याबाबत निर्णय जाहीर करणार आहे. वर्षा बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली असता साताऱ्यामधील विकास कामांबाबत चर्चा झाली असे ही उदयनराजे यांनी म्हटले. तसेच फडणवीस यांनी माझी काही कामे पूर्ण केली आहेत. परंतु त्याचा अर्थ मी भाजपात जाईन असे नसून मला वाटेल तेव्हा आणि मनाला पटणारा निर्णय मी घेणार असल्याचे ही उदयनराजे यांनी म्हटले आहे.