Udayanraje Bhosale | (Photo credit: archived, edited, representative image)

सध्या भाजपा खासदार असलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एनसीपी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यात भेट घेतल्याने चर्चा रंगल्या आहे. दरम्यान 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीमध्ये एनसीपीला रामराम थोकत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणूकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेतून खासदारकी दिली. मात्र आज त्यांच्या एका वक्तव्यामुळे राजेंची एनसीपी मध्ये घरवापसी होणार का? याची चर्चा रंगली आहे.

उदयनराजे पवारांना भेटल्यानंतर मीडीयाशी देखील बोलले. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारताच त्यांनी “शिवाजी महाराजांचं जसं सर्वधर्म समभाव हे धोरण होतं, तसंच माझंही धोरण सर्व पक्षीय समभाव असं आहे” या एका वाक्यामुळे त्यांची घरवापसी होणार का? याची देखील चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

दरम्यान उदयनराजे यांनी सोशल मीडीयात दिलेल्या माहितीमध्ये सातारा नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्तावाद्वारे मागणी केली. अशा कॅप्शनसह फोटो पोस्ट केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे काय? 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनानंतर उदयनराजे भोसले यांचा संतप्त सवाल .

उदयनराजे भोसले पोस्ट

नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलमध्ये उदयनराजे भोसले यांचा समावेश करून त्यांना बिनविरोध विजयी करण्यात आलं होतं. ही गोष्ट ताजी असतानाच आता उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात झालेली ही बैठक चर्चेचा विषय बनली आहे. येत्या काळात सातारा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीवर देखील या भेटीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.