Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

पुण्यात (Pune) कोरोना व्हायरचे (Coronavirus) आणखी 3 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोमवारी दोनवर असणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आता पाचवर पोहचली आहे. नायडू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली असल्याचं उघड झालं आहे. तसेच दुबईहून परतल्यानंतर दाम्पत्याला मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या टॅक्सीच्या ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 वर पोहचली आहे.

सध्या या रुग्णांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्याला मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या टॅक्सी चालकाचे रक्ताचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच या दाम्पत्याच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली. (हेही वाचा - इराण: कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मिथेनॉल प्राशन केलेल्या 27 जणांचा मृत्यू)

1 मार्च रोजी एक दाम्पत्य पुण्यात आलं होतं. हे पती-पत्नी एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते. परंतु, ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे हे दाम्पत्य महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली.