Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) शिरवळजवळ धनगरवाडी येथे भरधाव ट्रकने चक्क 6 वाहनांना धडक (Road Accident) दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वॅगनार कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात वॅगनार कार चक्काचूर झाली आहे. तसेच इतर वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकने वॅगनार कार, दुधाचा टँकर, मालट्रक, स्कॉर्पिओ आणि आणखी एक वाहन अशा सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात वॅगनार कारमधील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य 2 जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर प्रवासी आणि प्रवासी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. तसेच या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. या अपघातामुळे पुणे- बंगळरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. हे देखील वाचा- Palghar: मित्रांसोबत फ्रेन्डशिप डे साजरा करायला गेलेल्या एका मुलाचा धरणात बुडून मृत्यू

महाराष्ट्रातील सांगोल-मिरज मार्गावरील सोमवारी (2 ऑगस्ट) अशीच एक भयंकर घटना घडली होती. मालट्रक आणि प्रवासी ओमनी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 9 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने जवळीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दुर्घटनेत ओमनीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.