मित्रांसोबत फ्रेन्डशिप डे (Friendship Day) साजरा करण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना पालघर (Palghar) जिल्ह्यातील रोडखड धरण (Drowned in Rodkhad Dam) परिसरात रविवारी (1 ऑगस्ट) घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच साफाळे पोलीस घटनास्थळी दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच संबंधित मुलाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहे. ऐन फ्रेन्डशिप डेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
तन्मेष विकास तरे (वय, 17) असे मृत तरूणाचे नाव आहे. तन्मेष हा पालघर जिल्ह्यातील एडवन परिसरातील रहिवाशी आहे. तो आपल्या मित्रांसह फ्रेन्डशिप डे साजरा करण्यासाठी रोडखड धरण परिसरात गेले होते. त्यावेळी तन्मेष आपल्या मित्रांसह पोहण्यासाठी पाण्यात उतरला. परंतु, पाण्यात अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडला. त्यानंतर मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्यातून शोधून काढला. हे देखील वाचा- Nagpur Rape Case: नागपूर मध्ये अल्पवयीन तरूणीवर 2 वेळेस सामुहिक बलात्कार; 3 जण अटकेत
या घटनेची माहिती मिळताच साफाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करत तन्मेषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. पण ऐन फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मित्राचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती न्युज लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे.