Nagpur Rape Case: नागपूर मध्ये अल्पवयीन तरूणीवर 2 वेळेस सामुहिक बलात्कार; 3 जण अटकेत
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

आजही स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. नागपूरामध्ये एका 17 वर्षीय तरूणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान ही घटना मागील गुरूवारची असून या प्रकरणामध्ये सीताबर्डी पोलिसांनी चार रिक्षाचालकांना अटक केली आहे. मदतीच्या बहाण्याने सहा जणांनी मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर मधील या सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी मोहम्मद शहानवाज ऊर्फ साना मोहम्मद रशीद 25 वर्षीय आहे. तर अन्य आरोपी मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसूफ, मोहम्मद मुशीर आणि त्यांचा एक साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. Nashik Minor Girl Gang Rape Case: नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांना अटक. 

17 वर्षीय तरूणी दक्षिण नागपूरची रहिवासी होती. 29 जुलैला तिचा नातेवाईकांसोबत काही कारणावरून वाद झाला. तिने घर सोडलं. नंतर ती मेडिकल चौकातून रिक्षा करून मानस चौकात आली. यावेळी आरोपी मोहम्मद शहानवाज रिक्षात बसला होता त्याने तरूणीची चौकशी केली मात्र तिने फारसे काही उत्तर दिले नाही. पुढे मदतीचा बहाणा करून त्याने टिमकी परिसरात तरूणीला नेले. त्याच्या इतर मित्रांनाही त्याने बोलावून घेतले. चौघांनी तिच्यावर बलात्कार केला.मध्यरात्री पुन्हा त्याने तरूणीने मेयो हॉस्पिटल चौकात सोडले. तेथेही तिच्यावर रिक्षा चालकाने अत्याचार केला.

नागपूरातील या संतापजनक घटनेनंतर या शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पोक्सो अंतर्गत आणि अन्य भारतीय कलमांतर्गत संबंंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.