Nashik Minor Girl Gang Rape Case: नाशिक जिल्ह्यात अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 नराधमांना अटक केली आहे. नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात ही धक्कादायक घटना घडली. (Jalgaon Rape: खळबळजनक! गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक; जळगावच्या पथराड येथील घटना)
प्राप्त माहितीनुसार, अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी 7 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वाचा - Pune Rape: गुंगीचे औषध देऊन जीम ट्रेनर तरुणीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना)
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी पीडितेला चाकूचा धाक दाखवला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण अरिंगळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Gang Rape In Jalgaon: सामूहिक बलात्कार पीडित युवतीला पाजले विष, उपचारादरम्यान मृत्यू; जळगाव येथील थरारक घटना)
दरम्यान, डिसेंबरमध्ये पुण्यात एका जीम ट्रेनर तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पीडित तरुणीच्या सहकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित तरुणी आरोपीला जेवणाचा डब्बा देण्यासाठी आली होती. त्यावेळी आरोपीने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.