Gang Rape | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सामूहीक बलात्कार ( Gang Rape) केल्यानंतर आरोपींनी 20 वर्षीय पीडितेला जबरदस्तीने विष पाजून तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. अत्यावस्थ असलेल्या पीडितेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव (Jalgaon) येथे उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील पारोळा (Parola) तालुक्यात ही घटना घडली आहो. पीडिता ही दिवाळीसाठी आपल्या आजोळी आली होती. औषध आणण्यासाठी घराबाहेर पडलेली पीडिता घरी परतीलच नाही. त्यामुळे तिच्या आजोळच्यांनी शोधाशोध केली. पीडितेचा पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. दरम्यान, पीडितेसोबत मानवतेला काळीमा लावल्याची घटना घडल्याचा प्रकार पुढे आला.

प्राप्त माहितीनुसार, औषध आणण्यासाठी जाते असे सांगून घरातून 7 नेव्हेंबरच्या दुपारी बाहेर पडलेली तरुणी बराच काळ उलटूनही परतली नाही. शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या मामांनी 8 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, एका मुलीला विषबाधा झाली असून, ती अत्यावस्त आहे. तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरु अल्याची माहिती मिळाली. मामांनी जाऊन पाहिले असता अत्यावस्त असलेली पीडिता ही त्यांची भाची असल्याची ओळख पटली.

दरम्यान, पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे तिच्यावर पुढील उपचारासाठी तिला धुळे येथे घेऊन जाण्यास सांगण्यात आले. धुळे येथे उपचारादरम्यान ती शुद्धीवर आली. या वेळी तीने आपल्यावर सामूहीक बलात्कार झाला असून, आपल्याला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. या वेळी पीडितेने गावातील तिन तरुणांची नावे सांगितल्याचे समजते. आपले जबरदस्तीने अपहरण करण्यात आले. अत्याचार केल्यावर एका महिलेच्या मदतीने आपल्याला विष दिल्याचेही पीडितेने सांगितले. उपचारादरम्या, पीडितेचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Pune: शिरूरमध्ये 37 वर्षीय महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे निकामी करणाऱ्या आरोपीला अटक)

अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी ही पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील रहिवासी होती. ती आपल्या मामाकडे दिवाळीसाठी आली होती. पीडितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिवानंद शालिक पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.