Jalgaon Rape: खळबळजनक! गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक; जळगावच्या पथराड येथील घटना
Molestation| File Photo

जळगावच्या (Jalgaon) पथराड (Pathrad) येथील धरणगावात एका गतीमंद मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आरोपीच्या घरातून रडत बाहेर आल्यानंतर याप्रकरणाचा उलगडा झाला. पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी पाळधी पोलीस अधिक चौकशी करत आहे.

रमेश मंगा कळसकर (वय, 32) असे आरोपीचे नाव असून तो धरणगाव परिसरातील रहिवाशी आहे. याच परिसरात राहणारी गतीमंद मुलगी घराबाहेर खेळत होती. परंतु, संबंधित मुलगी आसपास दिसत नसल्याने आजीने तिच्या वडिलांना सांगितले. मात्र, बराच वेळ शोध घेतल्यानंतरही मुलगी सापडत नसल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, मुलगी आज सकाळी 10. 30 वाजताच्या सुमारास रमेशच्या घरातून रडत बाहेर लोकांनी पाहिले. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगत रमेश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसानी लगेच रमेशला अटक केली. हे देखील वाचा- Mumbai Rape: ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून इंजिनियर मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच पीडित तरुणीबाबत रुग्णालयातून अद्याप कुठलीही माहिती मिळाली नसल्याने त्यांनी सांगितले आहे.