Pune Police Big Decision On Transgender: सिग्नल (signals)वर आणि घरगुती समारंभांमध्ये पैशांसाठी तृतीयपंथीय (Transgender) कडून नागरिकांचा मानसिक झळ होत असलेल्या अनेक तक्रारी आजपर्यंत पुणे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यावर आता पुणे पोलिस (Pune Police)नी कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये यापुढे सिग्नलवर पैशांसाठी नागरिकांचा छळ झाल्यास त्यांची काही खैर नाही हे नक्की. यासंदर्भात पुणे पोलिसांनी तृतीयपंथींवर काही निर्बंध लादले आहेत. (हेही वाचा : Pune Koyta Gang: पुण्यात आता अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास पालकांवरही होणार कारवाई; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पालकांना इशारा )
मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथींवर पुणे पोलिसांकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी दिलेल्या आदेशामुसार त्यांनी सिग्नलवर उभे असलेल्या वाहन चालकांना त्रास दिला तर या तृतीयपंथीवर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. फक्त सिग्नलबाबतच नाही तर घरगुती समारंभमध्ये देखील आमंत्रणशिवाय हजेरी लावण्यास तृतीयपंथींना प्रतिबंध करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी आजपासून हे आदेश जारी केले आहेत. जर पुणे पोलिसांच्या आदेशांचे तृतीयपंथींनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. (हेही वाचा :Pune Police seized 100 Crore Drugs: तब्बल 100 कोटींचे अमली पदार्थ जप्त, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश )
तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. याबाबत पुणे पोलिसांनी निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील अनेक सिग्नलवर तृतीयपंथी नागरिकांकडून पैसे मागतात. यामुळे नागरिकांना त्रास होतो. या नागरिकांकडून पुणे पोलिसांकडे अनेक तक्रार आल्या आहेत. या तक्रारींनंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला.
फक्त पुण्यातच नाही तर राज्यातील सर्व भागात असे प्रकार घडताना दिसतात. पुणे पोलिसांनी पहिले पाऊल टाकून नवी सुरूवात केली आहे. मात्र, आता ती कितपत सत्यात उतरते ते पाहावं लागेलं.
#WATCH | Pune: On the issue of Section 144 to ban transgenders for asking money on traffic signals, Pune CP Amitesh Kumar says, "We are issuing an order under Section 144 of the CrPC. We have noticed large-scale nuisance of transgender and beggars, especially on traffic junctions… pic.twitter.com/6dcO67OxA4
— ANI (@ANI) April 11, 2024