Pune Police seized 100 Crore Drugs: तब्बल 100 कोटींचे अमली पदार्थ जप्त, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश
Drugs | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Pune Police seized 100 Crore Drugs: पुण्यातून पोलिसांनी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शहरातील विश्रांतवाडी परिसरातून सोमवारी( १९ फेब्रुवारी )रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा मारला होता.पोलिसांनी या छापेमारीतून १०० कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सोबत ५२ किलो मेफेड्रॉनचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीठाच्या पॅकेटमध्ये ड्रग्जची तस्करी केली जात असे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे.  मिळालेल्या मेफेडॉनची किमत तब्बल साडेतीन कोटी रुपये इतकी असणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील शोध सुरु आहे. मीठ विक्रीच्या आडून ड्रग्जची तस्करी केली जात असे.

वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५ पुणे), हैदर शेख (विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांना गुपित माहिती मिळाली होती की, सोमवार पेठेत एका सराईत गुन्हेगार वैभव एमडी ड्रगची डिलिव्हरी देण्यासाठी आला आहे. पोलिसांना सापळा रचत दोघांना ताब्यात घेतल. त्यांच्याकडून एमडी ५०० ग्रॅम सापडला. त्यानंतर चौकशीतून हैदर शेखची माहिती मिळाली. पोलिसांनी हैदरला ताब्यात घेतले त्यानंतर एक कोटीचे एमडी हाती लागली. त्याच्याकडे चौकशी केली त्यानंतर एका गोडाऊनमध्ये आणखी दीड कोटींचे एमडी ड्रग्ज आढळले.