महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आहे. यातच कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या (Chief Ministers Relief Fund) स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला संपूर्ण राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात राजकीय नेते, कलाकारांसह सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत गेल्या 3 दिवसांत एकूण 93 कोटी 5 लाख रुपये जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनापासून आभार मानले आहेत.
राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे, बुधवारी सकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात बाधितांचा आकडा हा आता 320 वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळपर्यंत मुंबईत 16 तर पुण्यात 2 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याला अर्थिक संकाटाला समोरे जावा लागत आहे. यातच मंगळवारी प्रामुख्याने शिर्डी संस्थानने 51 कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनपोटी 11 कोटी रुपये, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरने एक कोटी रुपये दिले आहे. हे देखील वाचा- Covid-19: अहमदनगर येथे कोरोना विषाणूबाबत व्हॉट्सऍपवर खोट्या माहितीचा प्रसार; एका व्यक्तीवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री सहाय्यता निधी खात्याची महिती खालीलप्रमाणे-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड- SBIN0000300
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.