गेले काही दिवस सोने चांदीचे (Gold Silver Rate) भाव अगदी गगनाला भिडले होते. पण आता सोन्याचे भाव मात्र काहीसे वधरल्याचं चित्र आहे. तरी तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हो आता सोन खरेदी करणं अधीक फायद्याचं ठरेल. नवरात्री (Navratri) पूर्वीचा अख्खा पंधरवाडा म्हणजे पितृपक्ष (Pitrupaksha). या कालावधीत नवीन वस्तू किंवा कुठलही महत्वाचं काम हिंदू संस्कृतीत (Hindu Sanskriti) केल्याजात नाही. त्याचं पार्श्वभुमिवर गेले काही दिवस सोने चांदिच्या खरेदीत मोठी घट झाली होती. पण आता दिवळी (Diwali) दसरा (Dussehra) अशा मोठ्या सणाच्या निमित्ताने सराफा बाजारात (Sarafa Market) मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
दसरा (Dasara) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असुन दसऱ्याच्या दिवशी सोन्याची (Gold) खरेदी केल्यास शुभ समजल्या जाते. तरी आज देशभरात सोन्याचे भाव देशभरात वधरले असुन जाणून घेवूया तुमच्या शहरात आजचा सोन्याचा दर. आज सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रामचा दर 51,120 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा (Silver) दर 61,160 रुपये आहे. (हे ही वाचा:- Mumbai Airport Garba Viral Video: मुंबई विमानतळावर रंगला गरबा, प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनी धरला ठेका; सोशल मिडीयावर भन्नाट व्हिडीओ व्हायरल)
आज मुंबईतील (Mumbai) सोन्याचे (Gold) दर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 51,120 रुपये तर 1 किलो चांदीचा दर - 61,160 रुपये एवढा आहे. तर पुणे (Pune) आणि मुंबई (Mumbai) या दोन्ही शहरातील सोन्याचे दर सारखे आहेत. नाशकात (Nashik) सोने (Gold) प्रति 10 ग्रॅम 51,140 रुपये तर 1 किलो चांदीचा दर - 61,220 रुपये आहे. तर नाशिक (Nashik) आणि नागपूर (Nagpur) या दोन्ही शहरात सोने चांदीची किंमत सारखी आहे.