Final Year Exams 2020: नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) कार्यक्षेत्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा (Final Year Exams) 60 टक्के ऑनलाईन आणि 40 टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Udya Samant) यांनी दिली आहे.
उदय सामंत आज नांदेड मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. या परीक्षा सर्व 13 अकृषि विद्यापीठात येत्या 3 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होतील. याशिवाय राज्यातल्या उर्वरित विद्यापीठात 90 ते 95 टक्के ऑनलाईन परीक्षा आयोजित केल्या जातील. सर्व विद्यापीठांतर्गत एकूण 7 लाख 92 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, असंही सामंत यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा -Mumbai University Exam 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेदरम्यान Digital Supervision द्वारे ठेवणार लक्ष; विद्यार्थ्यांचे इंटरनेट होणार फ्रीझ)
अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार - उदय सामंत https://t.co/1JC6qZAly9
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 18, 2020
राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यात ऑनलाईन (Online) पद्धतीने घेण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठाने या अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षांचं स्वरुपही जाहीर केलं आहे. या परीक्षा एमसीक्यू (MCQ) म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरुपात घेण्यात येणार आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नसंच देण्यात येणार असल्याचंही उदय सामंत यांनी यापूर्वी सांगितलं होतं.