PMC: पुणे महापालिकेतील एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad) स्थायी समितीच्या अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने एकच खळबळ माजली होती. या घटनेला एक आठवडा उलटला नाही, तोच पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) रस्ते विभागाच्या उपअभियंत्यास लाच (Bribe) घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंग हाथ पकडले आहे. याप्रकरणी आरोपी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. तसेच या अधिकाऱ्याची कसून चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

सुधीर विठ्ठलराव सोनावणे (वय, 51) असे लाच घेणार्‍या अधिकाऱ्यांचे नाव आहे. सुधीर सोनावणे हे पुणे महानगरपालिकेचे रस्ते विभाग वर्ग 2 मध्ये नेमणुकीस होते. दरम्यान, सुधीर यांनी एका शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल पास करून देण्यासाठी फिर्यादीकडे 50 हजारांची मागणी केली होती. अखेर 40 हजारात बिल पास करून देण्याचे ठरले. त्यानंतर फिर्यादीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कळवले. त्यानंतर फिर्यादीकडून लाच घेताना सुधीर सोनावणे यांना रंगेहाथ पकडले आहे. सुधीर सोनावणे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात लोकसत्ताने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Money Laundering Case: इकबाल मिर्चीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED समोर प्रफुल्ल मेहता यांची हजेरी, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता पुणे महानगरपालिकेत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी सिमितीच्या अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली. ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाने पेट घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील घटनेने यात आणखी भर पडली आहे.