Money Laundering Case: इकबाल मिर्चीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED समोर प्रफुल्ल मेहता यांची हजेरी, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण
एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल (Photo Credits-ANI Twitter)

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Pate) हे इकबाल मिर्ची  (Iqbal Mirchi)  प्रकरणी आज ईडी (ED) समोर हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्रवती काँग्रेसचे नेते दुपारी कार्यालयाक आणि काही वेळानंतर निघून गेले. पटेल यांनी मीडिया सोबत बातचीत करताना म्हटले की, मी इकबाल मिर्ची प्रकरणी काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी आलो होतो.(Afghan National With Nagpur Connection: नागपूरात बेकायदेशीर पणे राहणार्‍या अफगाणी व्यक्तीला मायदेशी पाठवल्यानंतर आता त्याचे हाती रायफलचे फोटो वायरल; नागपूर पोलिसांनी 'या' प्रकरणी दिली अशी प्रतिक्रिया)

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा निकटवर्तीय मिर्ची संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी यांनी याआधी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने सप्टेंबर 2019 मध्ये मिर्चीची पत्नी आणि अन्य जणांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मिर्ची त्याच्या परिवारातील सदस्य आणि त्यांच्या विरोधात मुंबईतील प्रमुख ठिकाणी सीजे हाउस, साहिल बंगला, राबिया हवेली, मरियम लॉज आणि सी व्यू संपत्तिच्या खरेदी-विक्री मध्ये कथित अवैध देवाणघेवाणासाठी एक अपराधिक गुन्हा दाखल केला होता.

सीजे हाउस मुंबईतील ताडदेव परिसरात वरळी आणि अरुण चेंबर्स दरम्यान स्थित आहे. ज्याची किंमत 76 कोटी रुपये आहे. अन्य संपत्तीची किंमत 500 कोटी रुपये आहे. ज्या मध्ये वरळीतील साहिल बंगला, राबिया मेंशन, मरियम लॉज आणि सी व्यू, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यावसायिक दुकानांसह लोणावळा मधील पाच एकर जमीनिचा समावेश आहे.

ईडीने आतापर्यंत कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि हुमायूं मर्चेंटसह काही आरोपींना अटक केली आहे. एजेंसीने डिसेंबर 2019 मध्ये विशेष पीएमएलए कोर्टात चार्जशीट दाखल केली होती.('राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी...'; अतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांना टोला)

ईडीने आतापर्यंत मिर्ची आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत भारत आणि परदेशात 789 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. येथील एका कोर्टाने मिर्ची याची पत्नी आणि दोन मुले यांना आर्थिक पळकुटे आरोपी म्हणून घोषित केले आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात भारत आणि परदेशातील त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.