Afghan man with Nagpur connection | PC: Twitter/ANI

अफगाणिस्तान (Afghanistan) मधील अराजकता सध्या अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अफगाणिस्तान मध्ये तालिबानी (Taliban) संघटना मिळवल्यानंतर आता त्यांनी भारतासोबत आयात-निर्यात सध्या थांबवली आहे. अशातच आता नागपूर मधून अफगाणिस्तानला डिपोर्ट केलेल्या व्यक्तीच्या हातात रायफल असलेला फोटो वायरल झाला आहे. आणि त्यामुळे अनेकांने त्याचे काही तालिबानी कनेक्शन आहे का? हा प्रश्न डोक्यात घुमायला लागला आहे. दरम्यान या प्रकरणावर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर पोलिसांच्या माहितीनुसार, एक व्यक्ती 10 वर्ष नागपूर मध्ये ट्रॅव्हल व्हिसा वर येऊन राहत होता. त्याच्याकडे वास्तव्यासाठी योग्य व्हिसा आणि कागदपत्र नव्हती. यानंतर सरकार कडून त्या अफगाणी व्यक्तीला मायदेशी पुन्हा पाठवण्यात आले होते. त्याचा येथे कोणत्याही गैरकृत्याशी निगडीत काहीही संबंध आढळला नसल्याने त्याला डिपोर्ट करण्यात आले आहे. मात्र आता सोशल मीडीयात काही फोटोमध्ये एक व्यक्ती हातात रायफल घेऊन आहे ती व्यक्ती हीच होती का? त्याच तालबानी कनेक्शन आहे का? याची कोणतीही माहिती सध्या पोलिसांकडे नाही. दरम्यान पोलिसांनी बोलताना या अफगाणी व्यक्तीच्या अंगावर बुलेट्स मार्क्स असल्याचं मात्र सांगितलं आहे.

दोन महिन्यांपूर्वीच त्याला डिपोर्ट करण्यात आले होते. 2010 पासून ही व्यक्ती नागपूरात राहत होता. या व्यक्ती कडून रेकी केलेली असू शकते. गुप्त समझौत्यांनी तो नागपूरात, महाराष्ट्रात राहिला असावा असे देखील म्हटलं जात आहे पण नागपूर पोलिसांनी मात्र यावर देखील सध्या त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान अफगाणिस्तान मधून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यानंतर तेथे अराजकता सुरू झाली आहे. राष्ट्राध्यक्षांनीही देशातून पळ काढल्याने सर्व नियंत्रण तालिबान्यांकडे आहे. आता अनेक अफगाणी लोकांची देश सोडण्यासाठी घाई बघायला मिळत आहे.