महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर वर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना वंदन केल्यानंतर भातखळकर यांनी ट्विट करत टीका केली आहे. "राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धव ठाकरे सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात," असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा; अतुल भातखळकर यांची टीका)
अतुल भातखळकर आपल्या पोस्टमध्ये लिहितात, "उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे. राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धवजी सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात." (BJP On Mumbai Local Resumption: मुंबई मध्ये भाजपा चं 'रेलभरो आंदोलन'; प्रविण दरेकर, अतुल भातखळकर रेल्वे प्रवासासाठी स्टेशन वर)
अतुल भातखळकर ट्विट:
उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे. @RahulGandhi शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धवजी सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात. https://t.co/PGGO9XbCVU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 20, 2021
आज माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राजीव गांधी यांची जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आणि उपस्थितांना ‘सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा दिल्याची पोस्ट मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँटलवर करण्यात आली होती. त्यावर ट्विट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.