BJP workers stage protest at Churchgate over resumption of local train services | PC: Twitter/ ANI

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये सध्या जेथे कोरोना स्थिती नियंत्रणामध्ये आहे तेथे राज्य सरकारने नागरिकांना कोविड नियमावलीमधून शिथिलता दिली आहे. मात्र मुंबईकरांना अद्याप मुंबई लोकल (Mumbai Local)  खुली करण्यात आलेली नाही. दरम्यान कोविड 19 लसीचे दोन डोस (COVID-19 Dose) घेतलेल्यांना आता मुंबई लोकल मधून प्रवासाची मुभा मिळावी यासाठी मागणी होत आहे. हीच मागणी रेटत भाजपाने (BJP) आज मुंबई मध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. Mumbai Local: लसीकरण पूर्ण झालेल्यांना मुंबई लोकल प्रवासासाठी स्वतंत्र व्यवस्था करा- कोर्ट.

मुंबई मध्ये कांदिवली, चर्चगेट रेल्वे स्थानकावर भाजपा नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी रेल्वे मधून प्रवास करण्याची तयारी वर्तवली आहे. तर मुंबई पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) देखील आज रस्त्यावर उतरले आहेत. चर्चगेट स्थानकामध्ये ते आले आहेत. तर अतुल भातखळकर यांनी कांदिवली स्टेशन मधून रेल्वे प्रवास करण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत गर्दी केली आहे. फ्रंट लाईन वर्कर्स सोबत पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिक ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी अशी मागणी केली आहे. Mumbai Unlock Updates:  मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकानं खुली; पहा नव्या नियमावलीनुसार नेमकं काय सुरू काय बंद?

प्रवीण दरेकरांना रेल्वे प्रवास नाकरण्यात आला आहे. मीडीयाला माहिती देताना त्यांनी तिकीट तपासकाकडून 260 रूपये दंड झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकार हुकुमशहा प्रमाणे वागत आहे. ना  मुंबई लोकल सुरू करत ना त्या मागणीसाठी आंदोलन करायला देत अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

 

राज्य सरकार कडून आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी सरकारने रेल्वे प्रवास सर्वसामान्यांना खुला करण्यासाठी अजून काही वेळ लागेल. सध्या जी मुभा दिली आहे त्याचे रूग्णसंखा वाढीवर काय परिणाम होतात हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. मुंबई मध्ये भाजपा सोबतच मनसे देखील मुंबई लोकल दोन डोस घेतल्यांसाठी खुली करण्याच्या मागणीवर आग्रही आहे.