Mumbai Unlock Updates: आजपासून मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकानं खुली; पहा नव्या नियमावलीनुसार नेमकं काय सुरू काय बंद?
BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रामध्ये आज (3 ऑगस्ट) पासून कोविड 19 नियमावलीमधून (COVID-19 Restrictions) शिथिलता मिळाल्याने अनेकांनी थोडा सुस्कारा टाकला आहे. मुंबई (Mumbai) शहरामध्ये आता कोरोना रूग्णांमधील वाढ ही चिंताजनक नसल्याने पालिका प्रशासनाने नागरिकांना काही निर्बंधांमधून आजपासून मोकळीक दिली आहे. दरम्यान मुंबई ची लाईफलाईन अर्थात मुंबई लोकल (Mumbai Local) ही सर्वसामान्यांसाठी खुली झालेली नसली तरीही आगामी सणासुदीचा काळ पाहता मुंबईत आता दुकानं खुली ठेवण्यास व्यापारांना रात्री दहा वाजेपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. राज्यात इतर शहरांमध्ये ही वेळ रात्री 8 वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे राज्यांच्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबई मध्ये पहा आजपासून कोणकोणत्या कोविड नियमावलीमधून नागरिकांना सूट मिळणार आणि कोणती बंधनं कायम असतील?

मुंबई मध्ये काल 24 तासांत 259 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. तर आता मुंबईत कोरोना रूग्ण दुपट्टीचा काळ 1500 दिवसांच्या  जवळ असून कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% आहे. नक्की वाचा: Maharashtra Unlock Guidelines: महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली जाहीर; जवळपास 25 जिल्ह्यांना दिलासा, 'या' ठिकाणी निर्बंध कायम.

मुंबई मध्ये काय सुरू असेल?

आठवडाभर दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत

मेडिकल स्टोअर्स 24 तास खुली

हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये सोमवार- शनिवार 4 वाजेपर्यंत डाईन ईन खुलं, 4 नंतर होम डिलेव्हरी, पार्सल सेवा

सिनेमांचं शूटिंग

ग्राउंड, गार्डन्स व्यायामासाठी

जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सोमवार ते शुक्रवार रात्री 8 तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत

मुंबई मध्ये काय बंद असेल?

शॉपिंग मॉल

धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं

राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक सोहळे

सिनेमागृह, नाट्यगृहं

स्विमिंग पूल

खूप जवळ संपर्क येईल असे खेळ

मुंबई मध्ये कोविड 19 च्या नियमावलीमधून नागरिकांना मुभा देण्यात आली असली तरीही रविवारी अनेक गोष्टी बंद असणार आहेत. विकेंड लॉकडाऊनमधून केवळ शनिवारी काही गोष्टींना दुपारी 3 वाजेपर्यंत मुभा असणार आहे. तसेच नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली असली तरीही मास्क घालणं, सोशल डिस्ट्न्सिंग पाळणं आणि हात सतत धुणं ही नियमावली पाळणं बंधनकारकच राहणार आहे.