
Raigad: रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये (Pen) अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडली आहे. पेणमधील वडगाव परिसरात मंगळवारी रात्री एका 3 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार (Rape) केल्यानतंर तिची हत्या (Murder) करण्यात आली आहे. पॅरोलवर सुटून आलेल्या एका आरोपीने हे कृत्य केलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (वाचा- Latur: धक्कादायक! लातूरमध्ये 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार; पीडितेची तलावात उडी घेऊन आत्महत्या)
प्राप्त माहितीनुसार, पॅरोलवर अलिबाग तुरुंगातून सुटलेल्या आरोपीने तीन वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार केला. मंगळवारी रात्री पीडितेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर संबधित परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पेणच्या ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक चौकशीत पीडितेवर बलात्कार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबियांनी आणि संबंधित परिसरातील नागरिकांनी सरकारी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. (वाचा - Bihar: सुकलेले कपडे काढण्यासाठी अंगणात आलेल्या तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील घटना)
दरम्यान, या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियाकडून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे पीडितेवर बलात्कार करणारा आरोपी हा याआधी बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याला जामिन मिळाला होता. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.