Latur: धक्कादायक! लातूरमध्ये 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार; पीडितेची तलावात उडी घेऊन आत्महत्या
नराधमाने एका 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केला आहे. विशेष म्हणजे अपमान सहन न झाल्याने पीडितेने तलावात उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे केवळ लातूरचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
Latur: लातूर जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधमाने एका 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केला आहे. विशेष म्हणजे अपमान सहन न झाल्याने पीडितेने तलावात उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे केवळ लातूरचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला कडक शिक्षेची मागणी केली आहे. (हेही वाचा - Maharashtra: पिंपरी चिंचवडमधील 26 वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक; Tinder ऑनलाईन डेटिंग अॅपवर झाली होती ओळख)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव किशन उगाडे असं आहे. आरोपी किशनला अटक करण्यात आळी आहे. संबंधित घटना ही लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे घडली. नराधमाने पीडितेला विश्वासात घेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या सुनेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Bhusawal: अनैतिक संबंधातून तरूणाची हत्या करून रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतदेह; जळगावच्या भुसावळ येथील घटना)
आपल्यावर बलात्कार झाला या अपमानामुळे पीडितेला मोठा धक्का बसला. यातून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने आत्महत्या केल्याचं समजल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा मृतदेह तलावातून बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या लाजिरवाण्या घटनेचा संपूर्ण राज्यातून निषेध केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2020 09:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

