Maharashtra: पिंपरी चिंचवडमधील 26 वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक; Tinder ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर झाली होती ओळख

पीडित तरुणी आणि आरोपी टिंडर या ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून भेटले होते. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करत मारहाण केली होती.

Maharashtra: पिंपरी चिंचवडमधील 26 वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक; Tinder ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर झाली होती ओळख
Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Maharashtra: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील 26 वर्षीय एअर होस्टेसवर (Air Hostess) बलात्कार (Rape) आणि मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. एफआयआरनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी टिंडर या ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून भेटले होते. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करत मारहाण केली होती. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात एकचं खळबळ उडाली होती. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात आरोपीला गजाआड केलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही इंडिगो एअर लाईन्समध्ये एअर होस्टेसचं काम करते. पीडित तरुणीची टिंडर या ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात खेचले आणि मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. सध्या पीडितेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Mumbai: धक्कादायक! धारावी परिसरात मुलाने केली आईच्या प्रियकराची हत्या)

वाकड पोलिस ठाण्यात या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेने आरोपीला विरोध केल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीचा कसून तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या पीडित तरुणीची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून टिंडर अॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2020 10:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).